ताज्या बातम्या

तालिबान आणि पाकिस्तान मधील तणाव वाढला!

तालिबान सरकार कडून पाकिस्तानची तोर्खम सीमा बंद!

20 फेब्रुवारी: पाकिस्तान आणि तालिबान मधील तणाव दिवसेंदिवस तणाव वाढतच चालला असून,तालिबान सरकारने पाकिस्तानची तोर्खम सीमा बंद केल्याने,पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.तालिबान्यांनी पाकिस्तानची तोर्खम सीमा बंद केली आहे.

तोर्खम पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील एक प्रमुख व्यापारिक सीमा आहे.अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर आता तालिबानी दहशतवादी आणि पाकिस्तान यांच्यातला वाद वाढत आहे. तालिबानमध्ये तहरिक -ए- तालिबानचे दहशतवादी वारंवार पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांवर हल्ला करत आहेत.

आता तर तालिबान्यांनी पाकिस्तानची तोर्खम सीमा बंद केली आहे. तोर्खम पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील एक प्रमुख व्यापारिक सीमा आहे. तालिबानने सांगितलंय की, पाकिस्तान आपली वचनं पाळत नाही. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने टीटीपी संदर्भातही पाकिस्तानला इशारा दिला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार तालिबानचे तोर्खमचे आयुक्त म्हणाले की, बॉर्डर पॉइंट प्रवास आणि ट्रांजिट ट्रेडसाठी बंद करण्यात आला आहे. तालिबानी आयुक्त मौलवी मोहम्मद सिद्दीकी यांनी ट्विट करत सांगितलं की, पाकिस्तान दिलेली वचनं पाळत नाही.

त्यामुळे आमच्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार सीमा बंद करण्यात आली आहे. त्यांनी अफगाणिस्तानातील लोकांना सल्ला दिला की त्यांनी पूर्वी नांगरहार प्रांतातील सीमा चौकीवरून प्रवास करु नये.मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील नागरिकांना पाकिस्तानात उपचार मिळत नसल्याने तालिबान भडकला आहे.

सीमा भागातील चौकी बंद केल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. कारण याच मार्गाने मध्य आशियातील देशांमध्ये व्यापार केला जातो. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता कहर बाल्खी यांनी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावलला सांगितलं की, अफगाणिस्तानातील सुरक्षा जगातील अनेक देशांपेक्षा चांगली आहे.

याआधी बिलावल म्‍यूनिख सुरक्षा संमेलनात म्हणाले होते की, आम्हाला अफगाणिस्तानावर हल्ला करण्याची इच्छा नाही. भूतकाळातल्या चुका आम्हाला परत करायच्या नाही. बिलावल यांनी सांगितलं होतं की, पाकिस्तानला तालिबानकडून ही अपेक्षा आहे की, ते आयएसकेपी आणि अफगाणिस्तानात सक्रीय असलेल्या इतर दहशतवादी गटांच्या विरोधात कारवाई करतील.

त्यांच्या ताब्यात आल्यानंतर पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था खराब झाली आहे.तालिबानी प्रवक्ता कहर बाल्खी यांनी सांगितलं की, आम्ही पाकिस्तानला सल्ला देतो की, द्विपक्षीय मुद्द्यांची आंतरराष्ट्रीय संमेलनात तक्रार करण्यापेक्षा समोर बसून चर्चा करावी.