मुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणी वाढ!
मुंबई, 20फेब्रुवारी: ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरनासिक च्या पंचवटीत पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने,संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अमित शाहांनी कोल्हापूर येथे उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून नासिक येथील एकनाथ शिंदे समर्थक योगेश बेलदार यांनी दाखल तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये राज्य सभेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री असलेल्या संविधानिक पदाची बदनामी केल्या प्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेले शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शिसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्याच राजकारणाला कलाटणी मिळाली. सध्या संपूर्ण राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळतोय. अशातच नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाकरे गटातीलसंघर्ष वाढला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (रविवारी) पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत जहरी टिका केली होती. यालाच प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले.