पुणे

मेट्रोत आता परतीचे (रिटर्न) तिकीट बंद होणार

पुणे : पुणे मेट्रोची सेवा पहिल्या टप्प्यातील मार्गिका 1-पिंपरीद्वारे चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि मार्गिका 2द्वारे वनाझ ते रुबी हॉल अशा एकूण 24 किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा सुरू आहे. उर्वरित 9 किलोमीटर मार्गाचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. सुरू असलेल्या मार्गावर प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून परतीच्या तिकिटाची सुविधाही महामेट्रोने उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता

Read more
देश

तृणमूल नेते शजाहान शेख संबंधित पश्चिम बंगालमध्ये छापे

कोलकाता : सक्तवसुली संचालनालयाने पोलिसांच्या मदतीने आज या धाडी टाकल्या. हावडा, बिजॉयगड आणि बिराटीसह शहरातील आणि आसपासच्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने शुक्रवारी पहाटे छापे टाकले आणि विविध कागदपत्रांचा शोध घेतला. फसवून जमीन बळकावण्यासंदर्भात या धाडी टाकण्यात आल्या. सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने आज फरारी तृणमूल काँग्रेस नेते शजाहान शेख याच्याशी संबंधित व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकले. एका जुन्या

Read more
कोकण

ओले काजूगर, पोपटीच्या शेंगांची आवक मुरुड बाजारात रेलचेल

मुरुड : आदाड, खारआंबोली, शिघ्रे, तेलवडे, उंडरगाव, काकळघर, कोर्लई, जोसरांजन, शिघ्रे नविवाडी, केळघर, म्हसाडी, गोपळवट आदी गावांतून महिला पोकळा, वांगी, मेथी, काळाभोपळा, पालक, भेंडी, दुधीभोपळा, गावठी कोथिंबीर, गावठी रताळी, पपई, वाल पापडी, घेवडा शेंगा, वालाच्या हिरव्यागार शेंगा, शेवगाच्या शेंगा, कलिंगडे, गावठी वेलची केळी, पडवळ आदी गावठी भाज्यादेखील मुबलक प्रमाणात विक्रीस आणत आहेत. शनिवार,रविवारी इथे फिरायला

Read more
ताज्या बातम्या

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी आकाश हिवराळे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून सदैव विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असते गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील व अमरावती विभागातील असंख्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आकाश हिवराळे यांनी अनेक यशस्वी आंदोलने केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, प्रवेश क्षमता वाढ,कोरोना काळात परीक्षा न घेता सरसकट पास करून देण्यासाठी

Read more
ताज्या बातम्या राजकीय

सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई  :  शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर

Read more
आंतरराष्ट्रीय

अंतराळ क्षेत्रात आता 100% विदेशी गुंतवणूक

नवी दिल्ली : अंतराळ क्षेत्रातील थेट परदेशी गुतवणुकीसंदर्भातील धोरणाच्या बदलास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अंतराळ क्षेत्रात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. अंतराळ क्षेत्रातील भारतीय कंपन्यांमध्ये उदारीकृत प्रवेश मार्गांद्वारे गुंतवणुकीच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारने दिलेल्या माहितीनुसार,

Read more
राजकीय

राज्याची दूध उत्पादक शिखर संस्था अखेर केंद्र सरकारच्या ताब्यात

मुंबई : राज्याची दूध उत्पादक शिखर संस्था महानंदा डेअरी अखेर केंद्र सरकार संचालित राष्ट्रीय दुग्धविकास संस्थेच्या ताब्यात गेली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे मुख्यालय गुजरात राज्यातील आणंद गावी आहे. याच आणंद गावात अमूलचे मुख्यालय आहे. महानंदा डेअरी हळूहळू पूर्ण बंद करून डेअरीची गोरेगाव येथील 50 कोटी रुपयांची 27 एकरची प्रचंड जमीन अदानी उद्योगाकडे देण्याचे हे

Read more
आंतरराष्ट्रीय

पंतप्रधानांचा भाऊच कंबोडियाचा उपपंतप्रधान

नोम पेन्ह : कंबोडियाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सहा महिन्यांनी पंतप्रधान हुन मानेट यांनी त्यांचा भाऊ श्री मैनी यांच्या नावाची उपपंतप्रधान म्हणून घोषणा केली आहे. उपपंतप्रधान श्री मैनी हे पंतप्रधान हुन मानेट यांचे भाऊ आणि माजी पंतप्रधान सैमडेक टेको हुन सेन यांचे धाकटे चिरंजीव आहेत. १२० खासदारांच्या उपस्थितीत श्री मैनी यांच्या उपपंतप्रधान पदाला मान्यता देण्यात आली.

Read more
महाराष्ट्र

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न लवकरच सुटणार?

बेळगाव : महाराष्ट्र सरकारने सीमा खटल्याची सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठी भाषिकांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे गरजेचे आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या संपर्कात असून कर्नाटक सरकारची कन्नडसक्ती दूर करण्यासाठी सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला

Read more
महाराष्ट्र

विवाहाच्या आधारावर बडतर्फ करणे हे लिंगभेद आणि असमानतेचे मोठे लक्षण – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : विवाहाच्या कारणास्तव महिला अधिका-याला बडतर्फ करणे ही मनमानी आहे, असे मत मांडत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला माजी लष्करी परिचारिकेला ६० लाख रुपयांची भरपाई देण्यास सांगितले आहे. लष्करी नर्सिंग सेवेतून एका महिला नर्सिंग अधिका-याला विवाहाच्या आधारावर बडतर्फ करणे हे लिंगभेद आणि असमानतेचे मोठे लक्षण असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि

Read more