महाराष्ट्र

पटोले कार अपघातप्रकरणी ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला धडक देणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रक चालकाला देखील अटक करण्यात आली आहे. गोवर्धन कुसरामला असे त्याचे नाव आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर घातपात घडवण्याता प्रयत्न असावा, असा आरोप झाल्याने ट्रक चालकाची सध्या कसून चौकशी सुरु आहे. ९ एप्रिल रोजी रात्री भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ नाना पटोले यांच्या कारचा अपघात झाला होता. प्रचार आटोपून सुकळी गावाच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये नाना पटोले थोडक्यामध्ये बचावले. या अपघातानंतर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. ‘अपघात की घातपात? पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल’, असे त्यांनी म्हटले.