देश

मतदान राहिलं बाजूला ‘या’ पोलिंग ऑफिसरचीच रंगली जास्त चर्चा!

मुंबई – उत्तर प्रदेशातील सहारनपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आठ लोकसभा जागांवर मतदान होत आहे. पण मतदान राहिले बाजूला, इथे एका महिला पोलिंग ऑफिसरचीच जास्त चर्चा रंगतेय. आपल्या ग्लॅमरस लूकमुळे ही ऑफिसर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ईशा अरोरा असे या पोलिंग ऑफिसरचे नाव आहे. तिचे सौंदर्य एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

आपल्या ग्लॅमरस लूकसाठी व्हायरल होऊ लागलेल्या ईशाने तिच्या लूक आणि सौंदर्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलेली ईशा गंगोह विधानसभेच्या महगी गावात ड्युटीवर आहे. पण, यावेळी मतदानाशिवाय लोक तिच्या लूकबद्दल चर्चा करत आहेत.

आपल्या कामाबाबत ईशा म्हणाल्या की, ‘आपल्याला कोणतेही काम मिळाले तरी ते हलक्यात घेऊ नका, कामं वेळेवर झाली पाहिजेत. कार्यालयात जाणे असो किंवा मतदान केंद्रावर येणे असो. प्रत्येकाने वेळेची काळजी घ्यावी आणि नियमित काम करण्याचा प्रयत्न करावा. तसे नसेल तर एवढी मोठी निवडणूक घेणे शक्य होणार नाही. आपण आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.