अर्थ

शेअर बाजारात तेजी

मुंबई : शेअर बाजारातील व्यवहार आज वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स आज ७२,५७० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३,३६४ पर्यंत वाढला. शेवटच्या सत्रात सेन्सेक्स ३३५ अंकांनी वाढून ७३,०९७ वर बंद झाला. निफ्टी १४८ अंकाच्या वाढीसह २२,१४६ वर स्थिरावला.
सेन्सेक्सवर एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, भारती एअरटेल, एलटी, एम अँड एम, टीसीएस, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स हे शेअर्स सर्वाधिक वाढले. ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील या शेअर्समध्ये घसरण झाली.