देश

भारताचा भूभाग चीनने बळकावला – सोनम वांगचूक

लडाख – भारताचा सुमारे चार हजार चौरस फूटांचा भूभाग मागील काही दशकांत चीनने बळकावला असून सरकारकडून ही माहिती लपवली जात आहे,असा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी केला.

मागील काही दशकांत चीन लडाखमध्ये सातत्याने अतिक्रमण करीत आहे. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण खुपच वाढले आहे. त्याविरोधात कोणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला देशद्रोही ठरविले जाते. धमकावले जाते. ज्या गुराख्यांच्या गुरचराईच्या जमिनी चीनच्या घशात गेल्या आहेत त्यांना तोंडातून ब्र काढणेही शक्य नाही. त्यांचा आवाज सरकारकडून दाबला जात आहे,असे वांगचूक म्हणाले.

चीनच्या अतिक्रमणाविरोधात आपण सीमेपर्यंत धडक मोर्चा काढण्याचे जाहीर केले तेव्हा आपल्याला काही लोकांनी देशद्रोही म्हटले. काहींनी धमकावण्याचा प्रयत्न केला.चीनने भारताचा चार हजार चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केला आहे. एका शहराएवढा हा भूभाग आहे. त्याबद्दल सरकार काहीही बोलायला तयार नाही,असे वांगचूक पुढे म्हणाले.