महाराष्ट्र

राहेरच्या हेमाडपंती मंदिराचा लवकरच कायापालट होणार

नांदेड – नांदेडच्या राहेर येथील हेमाडपंती नृसिंह मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे. मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी राज्य शासनाने मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने १४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली हेमाडपंती मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे.

हेमाडपंती नृसिंह मंदिर अतिशय प्राचीन आहे. हेमाडपंती मंदिरात नृसिंहाची मूर्ती असून येथील ग्रामस्थ मंदिरात दररोज पुजेसाठी येतात. मात्र सध्या या मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. ऐतिहासिक हेमाडपंती मंदिराची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे आता राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने हेमाडपंती मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने १४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली या मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.