महाराष्ट्र

कांद्याची आवकवाढल्याने दरात घसरण

सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून दरात मात्र घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. हिवाळ्यात लागवड करण्यात आलेल्या कांद्याच्या काढणीला आता सुरुवात झाली आहे. मार्केट येणार कांदा हा रांगडा कांदा म्हणून ओळखला जातो. हा कांदा टिकत असल्याने घरात साठवून ठेवता येतो. यामुळे याची मागणीदेखील मोठी असते. सध्या या कांद्याची काढणी सुरू झाली असून शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आणला जात आहे.

सोलापूर बाजार समितीमध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून मोठ्या संख्येने सोलापुरात येत आहे. यामुळे जवळपास ४०० गाड्यांची आवक झाली आहे. परिणामी दरात घसरण झाली असून सध्या १४०० ते १५०० रुपये प्रतीक्विंटल मिळत आहे. यात निर्यातबंदी अनिश्चित कालावधीसाठी वाढवल्याने कांद्याचे दर घसरल्याचे शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.