suicide-in-akola
अकोला ताज्या बातम्या

पोलीस ठाण्याच्या जवळ विषारी औषध घेऊन प्रेमी युगालांचा आत्महत्येचा प्रयत्न

युवकाचा मृत्यू तर युवतीची मृत्यूशी झुंज!

अकोला, 20 फेब्रुवारी: अंदाजे सोळा सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी तसेच 23 वर्षाचा युवक या प्रेम युगालांनी उरळ पोलीस स्टेशन जवळ येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र समोर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची खळबळ जनक घटना उरळ पोस्टाच्या हद्दीत घडली.

या घटनेत 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असुन, यामधील युवती मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेला उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर गोमासे जबाबदारअसल्याचा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे.

उरळ पोलीस अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आपल्या भावानेआत्महत्या केल्याचा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळेच कलाटणी मिळन्याचे संकेत प्राप्त होत आहे.प्राप्त माहितीनुसार अतुल संजय बायधणे वय अंदाजे 23 वर्ष राहणार संगाई बाजार अकोट फाईल अकोला येथे राहणाऱ्या या युवकाचे उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावांमधील अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध जडले होते.

सदर बाब अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला कळली होती. त्यावरून मुलीच्या पालकांनी मृतक अजय बायधने याच्या विरोधात उरळपोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यावरून अतुल संजय बायधणे याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून अतुल बायधणे याला अटक करण्यात आली होती.त्यानंतर अतुल बायधणे व अल्पवयीन मुलगी हे 31 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे पळून गेले होते.

उरळ पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलीला अतुल बायधणे याने पळवून नेल्या ची तक्रार अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिली. सदर करण्याचा तपास उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर गोमासे करीत आहेत.

सदर प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक यांनी मृतक अतुल बायधणे यांच्या आई-वडिलांना तसेच मृतकाच्या भावाला पोलीस उपनिरीक्षक सागर गोमासे यांनी सर्वांवर गुन्हे दाखल दाखल करणार असल्याचे धमकावले असल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

मृतकाच्या वडिलांनी सदर युवकास व अल्पवयीन मुलीला दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पुण्यावरून अकोला येथे मृतकाच्या मावशीच्या घरी शिवसेना वसाहत अकोला इथे आणले होते. 20 फेब्रुवारीला सदर अल्पवयीन मुलगी तसेच मुलगा अतुल बायधणे याला उरळ पोलीस स्टेशनमध्ये नेणार होते. मात्र सदर अल्पवयीन मुलगी तसेच या युवकांनी उरळ पोलीस स्टेशन समोर असलेल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये सदर युवकाचा मृत्यू झाला असून अल्पवयीन मुलगी ही मृत्यूची झुंज देत आहे.अतुल बायधण याच्या मृत्यूला कारणाभूत असल्याचा आरोप असणाऱ्या उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर गोमासे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतकाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा त्याच्या नातेवाईकांनी दिला.

सदर प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मृतकाच्या कुटुंबांनी भेटून कारवाई करण्याची मागणी रेटून धरली होती. यावेळी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणाची कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला.

यावेळी उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वळतकर हे स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. यावेळी उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी संबंधिता वर कारवाई करणार असल्याचे मृतकाच्या नातेवाईकाला सांगितले.