ताज्या बातम्या महाराष्ट्र

खडसेंना छोटा शकील गँगकडून धमकी, गुन्हा दाखल

जळगाव – ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकीचे फोन आले आहेत. छोटा शकील गँगकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ आणि १६ एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिली आहे. प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिस करत आहेत.

एकनाथ खडसे यांनी सांगितले की, “वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकी देण्यात आली आहे. पहिल्या फोनवरून त्यांना फोनवरून सांगण्यात आलं की, दाऊद छोटा शकील गँग तुम्हाला मारणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर दुसऱ्या वेळी फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्ही तुम्हाला सांगितलं तरीदेखील तुम्ही कोणती पावले उचलली नाहीत. फोननंतर मी तक्रार दाखल केली आहे. तब्बल ४ ते ५ वेळा खडसेंना फोन आला आहे. एक फोन अमेरिकेवरून आला आहे, तर एक लखनऊ येथून आल्याची माहिती आहे. याआधी देखील त्यांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. धमकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.