तंत्र-विज्ञान

IRCTC च्याAppच्या माध्यमातून२ मिनिटांत रेल्वे तिकीटची बुकींग होणार ! 

नवी दिल्ली२५ऑगस्ट:-रेल्वे तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ यासाठी आता काळजी करण्याची गरज नसेल.कारण  IRCTC ने एक नविन मोबाईलAppलाँच केले आहे. या मोबाइलappच्या माध्यमातून दोनच मिनिटांच्या वेळात रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करण्याचा दावा करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आर. सी.टी. सी.ने दोन योजना लागू केल्या आहेत. या योजनेच्या अंतर्गत प्रवासी आपले तिकिटांचे सहज आरक्षण करू शकतील.सोबतच प्रवासीआपल्या मोबाईल द्वारे गाडीत असलेल्या केटरिंग सोबत संपर्क साधून, आपल्या सिटवरच भोजन उपलब्ध करू शकणार आहे. आय. आर.सी.टी.सी.”कनेक्ट” नाम अंतर्गत या app ला प्रवासी आपल्या मोबाईल मध्ये मोफत डाऊनलोड करू शकतात, ही रेल्वे प्रशासनाची अधिकृत मोबाईल तिकीट अँप आहे.भारतीय रेल्वेच्या या app ला आतापर्यंत१०लाख लोकांनी डाउनलोड केल्या असल्याचा दावा रेल्वे विभागाने केला आहे.आज रोजी या app ची चाचणी सुरू असल्याने, सकाळी८ते१२वाजेपर्यंत तिकीट बुकिंग बंद असल्याने, या app वर तात्काळ तिकिटांचे आरक्षण बंद, असले तरी ते लवकरच सुरू होणार आहे