H3N2
आरोग्य देश

H3N2 Updates : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा; नीती आयोगाचे आवाहन

इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता

मुंबई: गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे.

H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून घ्ण्श्R नं हा विषाणू H3N2इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत.

H3N2इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकार्‍यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे.

राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे.सध्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही बेजार झाली आहेत. औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळताना दिसत नाहीय. हा व्हायरल संसर्ग H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होत आहे.

H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा उपप्रकार म्हणजेच बदललेलं स्वरुप आहे.देशात व्हायरल H3N2इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रमाणे आता H3N2विषाणू तांडव करणार की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं सल्ला देत मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

H3N2इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू आहे. याची लक्षणे कोरोना प्रमाणेच आहेत. ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.

केंद्र सरकारची तातडीची बैठक H3N2इन्फ्लुएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकार्‍यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत करोना प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे. इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्लोंप्ध् ने दिला आहे.