vidarbh-kesari kusti
अकोला

विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेच्या चाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला, प्रतिनिधी / १८ फेब्रुवारी:  अकोला शहर कुस्तीगीर तालीम संघ व अकोला ग्रामीण कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवापुर रस्त्यावरील मातोश्री सभागृहात शुक्रवारी संपन्न झालेल्या विदर्भ केसरी गटासाठीच्या निवड चाचणीस मल्लांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अमरावती येथे दि २० फेब व २१ फेब रोजी होणाऱ्या महिला व कुमार स्पर्धा तसेच दि २५ व २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुरुष गटाच्या विदर्भ केसरी साठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. यात संपूर्ण जिल्ह्यातील महिला पुरुष मल्लांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या चाचणीचा प्रारंभअकोला शहर कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष विष्णू मेहरे, सचिव युवराज गावंडे, विजय उजवणे, ग्रामीण अध्यक्ष चंदूभाऊ शिरसाट, रऊफ पहेलवान, नजीर पहेलवान, प्रशांत खोरे बाळू धुर्वे, वैभव मेहरे, संतोष महाकाल आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत आपल्या शुभेच्छा प्रदान केल्यात.

या कुस्ती चाचणीसाठी शहरी व ग्रामीण भागातुन अनेक युवक, युवती मल्ल मातोश्री सभागृहात उपस्थित झाले होते. स्पर्धकांच्या अल्पोपहाराची व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली होती.अत्यंत चुरशीच्या लढतीत विजयी पैलवानांचे युवराज गावंडे व अन्य मान्यवरांनी रोख पारितोषिके देऊन स्वागत केले.

या चाचणीत महिला श्रेणीच्या ५० किलो वजन गटात निशा शेंगोकार हिची निवड करण्यात आली, ५९ किलो वजन गटात सेजल काळपांडे विजयी ठरली, ६२ किलो वजन गटात वैष्णवी यादव व ६८ ते ७५ किलो वजन गटात साक्षी माळी विजयी ठरली.

पुरुष श्रेणीतील ५७ किलो वजन गटात मो. अजान विजयी ठरला.६ १ किलो वजन गटात अब्दुल जाकीर हा विजयी झाला. ६५ किलो वजन गटात प्रथमेश कवडे, ७० किलो वजन गटात सौरभ रोहनकर, ७४ किलो वजन गटात शंकर ससाणे, ७९ किलो वजन गटात सचिन गांगे व ७५ ते १२५ किलो वजन गटात सिध्दांत गवई व शहनाज हुसेन विदर्भ केसरी यांनी बाजी मारली. विजयी मल्ल हे आगामी अमरावती येथे होणाऱ्या विदर्भ केसरी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

यावेळी संजय श्रीनाथ, संतोष गवई, अनिल कांबळे, विनायक गुलाने मूर्तिजापूर, संजय पाटील, प्रकाश उर्फ गट्टू शिरसाट, कृष्णा मिश्रा, संतोष बुंदेले, निखील वाकोडे, आकाश इंगळे, सौरभ खंडारे, सुनील झाडे, सुरेश श्रीनाथ, हेमंत अंभोरे, उमेश माळी, रामू तिवारी, रवी मुळे, गणेश श्रीवास, प्रविण सुतार, सुरेश धोत्रे समवेत अनेक महिला, पुरुष मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते.