अर्थ

सोन्याचा दरात पुन्हा उच्चांक

मुंबई – सोने आणि चांदीच्या दरात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज देखील सोने आणि चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. आज १० ग्रॅम सोन्याचा दर ६६,७७८ रुपये होता. तसेच आज चांदीचा दर ७८,३२३ रुपये होता. सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. अशातच सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ६६,२५० रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये आज वाढ झाली. येत्या काही दिवसांमध्ये गुढीपाडव्याचा सण आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. यामुळे येत्या काळातही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.