मनोरंजन

दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने ‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियामणीवर टीकेचा भडीमार

मुंबई : अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्रियामणीने मुस्तफा राजशी लग्न केलंय. ट्रोलिंगचा परिणाम तुझ्या खासगी आयुष्यावर झाला का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. “खरं सांगायचं झालं तर माझ्यावर किंवा माझ्या आईवडिलांवर त्याचा अजिबात परिणाम झाली नाही. माझा पती माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला”, असं तिने सांगितलं.

“माझ्या पतीने मला आश्वासन दिलं होतं की, काहीही घडलं तरी ते सर्वांत आधी माझ्याकडे यावं याची काळजी मी घेईन. पण मी फक्त इतकंच सांगेन की प्रत्येक पावलावर तू माझा हात पकड आणि माझी साथ दे. आम्ही दोघं ज्यावेळी एकमेकांना डेट करत होतो, तेव्हासुद्धा मला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मी त्याला तीच गोष्ट सांगितली होती की, माझ्यासोबत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव.