महाराष्ट्र

साताऱ्यात माजी सैनिकांच्या कोट्यवधींच्या ठेवी गायब

कराड  – सातारा जिल्ह्यातील अनेक माजी सैनिकांच्या पोस्टाच्या खात्यावर असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गायब झाल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोस्टाने संबंधित तक्रारींची दखल घेण्यासाठी एक समिती नेमली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी एक माजी सैनिक आपली आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट रक्कम काढण्यासाठी पोस्टात गेला होता. त्यावेळी त्याच्या खात्यात शून्य रक्कम शिल्लक असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. अनेक माजी सैनिकांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. हा घोटाळ्याचा आकडा १० कोटींच्या घरात असून तो काही पटींनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोस्ट खात्याचे एजंट, कर्मचारी आणि एजंटांना नेमणारे जिल्हाधिकारी कार्यालय या घोटाळ्याच्या वादात सापडले सापडले आहे.