आंतरराष्ट्रीय

रॉलेक्सचे घड्याळामुळे पेरूच्या राष्ट्राध्यक्षांची भ्रष्टाचार चौकशी

लिमा – पेरू देशाच्या राष्ट्रपती डिना बौरुटे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात रॉलेक्सचे महागडे घड्याळ घालणे त्यांना चांगलेच महागात पडले. या घड्याळ प्रकरणात काही भ्रष्टाचार आहे का, हे शोधण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली. पेरुच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर त्यांच्या निवासस्थानी ही धाड टाकण्यात आली. त्यावेळी त्या घरी नव्हत्या अशीही माहिती देण्यात आली आहे.

पेरूच्या राष्ट्रपती डिना बौरुटे यांची सध्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यातच या महिन्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या हातातल्या रॉलेक्स या महागड्या घड्याळाचा फोटो प्रशासनाच्या नजरेत आला. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन त्यांच्या घरी या घड्याळाचा शोध घेण्यासाठी धाड टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हे घड्याळ आपण विकत घेतले असून त्याचा पुरावा देण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यामुळे आज ४० पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी ही धाड मारण्यात आली.

यावेळी ते घड्याळ व त्याची कागदपत्रे तपासण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याची माहिती प्रशासकाने दिली. विशेष म्हणजे या कारवाईचे थेट प्रक्षेपण स्थानिक टिव्ही वाहिनीवर करण्यात आले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे निवासस्थान घेरले असून निमा या राजधानीत त्यांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते वाहतूकीसाठी बंद केले. पेरुच्या घटनेनुसार या प्रकरणात त्या दोषी आढळल्या तरी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत किंवा त्यांना पदच्चुत करेपर्यंत त्यांच्यावर खटला चालवता येणार नाही.