१० डिसेंबर मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू चर्चेत आले आहेत. आयकर विभागाने साहू यांच्या झारखंडमधील घरावर छापा टाकून तब्बल ३०० कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. हा आकडा अजून वाढू शकतो, असा दावा केला जातोय.
म्हणूनच, जप्त केलेल्या पैशांची मोजणी लवकर पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाने रविवारी (१० डिसेंबर) नोट मोजणार्या मशीनची आणि कर्मचार्यांची संख्या वाढवली आहे.आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशनआयटी अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, धीरज साहूंकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
आतापर्यंत ३०० कोटी रुपयांची रोकड मोजली गेली आहे. अजून बरीच रक्कम मोजणे बाकी आहे, त्यामुळे हा आकडा चारशे कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा असल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली.
नोटा मोजण्यासाठी आणखी मशीन्स मागवल्याजप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी सुरुवातीला बँक कर्मचार्यांसह ३० हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. पण, आता मोजणी त्वरीत पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाने सुमारे ४० लहान-मोठ्या मशीन्स तसेच आणखी कर्मचारी मागवले आहेत.
राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संलग्न असलेल्या मद्य कंपनीकडून एवढी मोठी रोकड जप्त केल्याने काँग्रेसही त्यांच्यापासून दूर झाले आहे.पीएम मोदींची काँग्रेसवर टीकाया प्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटले की, ‘खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही.’
दरम्यान, पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आर्हे. ें वर हसणारा इमोजी शेअर करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली.