आंतरराष्ट्रीय

चीनने पाकिस्तान नौदलासाठी आधुनिक पाणबुडी तयार केली

बिजिंग – चीनने पाकिस्तानसाठी तयार केलेल्या ८ हँगोर श्रेणीची एक अद्ययावत पाणबुडी चे जलावतरण केले आहे. चीन व पाकिस्तानमध्ये लष्करी सामुग्री पुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या कराराचा एक भाग म्हणून ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे.

या पाणबुडीच्या जलावतरणासाठी चीनमध्ये एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. ही स्टेट ऑफ आर्ट पाणबुडी अनेक शस्त्र, अस्त्र आणि आधुनिक प्रणालीने सज्ज आहे. काल वुचांग जहाजबांधणी उद्योग गटाच्या शुआंगुली गोदीत या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले.

यावेळी पाकिस्तानचे नौदल प्रमुख अॅडमिरल नाविद अशरफ हेही उपस्थित होते. पाकिस्तान व चीनमध्ये ८ अत्याधुनिक पाणबुड्या पुरवण्याचा करार झाला होता. त्यातील ही पहिली पाणबुडी आहे. या करारातील ८ पाणबुड्यांमधील ४ पाणबुड्या या चीनमध्ये तर ४ पाकिस्तानात बांधण्यात येणार आहे. या करारामुळे पाकिस्तान व चीन यांच्या मैत्रीचा एक नवा अध्याय सुरु होणार आहे.