मुंबई

दहा ते बारा हजार रुपयांत मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका

मुंबई –  गुणपत्रिकामिळत असल्याचं विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आलं आहे. या प्रकरणी मुंबई विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या प्रकरणात आता किती जणांची बनावट गुणपत्रिका देऊन फसवणूक करण्यात आली आहे हे तपासण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका 10 ते 12 हजारात घरी बसून मिळेल अशी जाहिरात काही दिवसापूर्वी फेसबुक या समाज माध्यमावर आली होती. त्यानंतर पुणे येथील एका व्यक्तीने ती जाहिरात पाहून, त्याने काही रक्कम दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसॲपवर एक बनावट गुणपत्रिका मिळाली अशाप्रकारची माहिती विद्यापीठास प्राप्त झाली आहे.

संबंधित प्रकरणाची मुंबई विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. यावर मुंबई विद्यापीठ पोलीस स्थानकांमध्ये याची सायबर तक्रार नोंदविणार आहे. विद्यार्थ्यांनी अशा बनावट गुणपत्रिका आणि पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.