ओबीसी बंधू -भगीनींनी या ऐतिहासिक परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाडेगांव समितीने केले आहे.
अकोला 18 फेब्रुवारी (राज्योन्नती ब्युरो) : ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासह ओबीसींच्या हिताचे व अत्यल्प समाजाचे हित जोपासण्या करिता ऐतिहासिक परिषद २०२३ चे आयोजन सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाडेगाव ता. बाळापुर जि. अकोला येथील अवलिया अर्जुन महाराज संस्थान येथे करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक परिषदेस मुख्य मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून बहुजनांचे दिपस्तंभ श्रध्देय श्री अॅड बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून गोपाल राऊत तर स्वागताध्यक्ष म्हणून बालमुकुंद भिरड तर या परिषदेचे ऐतिहासिक ठराव वाचक म्हणून अॅड संतोष राहाटे हे असुन या ऐतिहासिक परिषदेला मार्गदर्शक म्हणून आद. प्रा. डॉ. अंजलीताई आंबेडकर, मा. रेखाताई ठाकुर, मा. निलेश विश्वकर्मा, मा. अशोक सोनोने, महेश निनाळे, मा. डॉ. सुदर्शन भारती, डॉ. दिपक मस्के, सचिन डोरले, राजेश पंडित, सोमनाथ साळुंके, गोविंद, दळवी, नागोराव पांचाळ, प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, मा. राजेंद्र पातोडे, सौ. अरूंधतीताई शिरसाट, डॉ. सिद्धार्थ देवळे, सौ. सविताताई मुंडे, प्रा. डॉ. निशाताई शेंडे, मा. अमितभाई भुईगळ, मा. फारूख अहमद, किरणताई गिऱ्हे, संतोष बनसोड, लक्ष्मण पाटील, ह.भ.प. श्री. रामहरी गवारे, कैलास खडसान, प्रा. डॉ. अनिल अमलकार, सौ. मंजुषाताई निंबाळकर, ह.भ.प. श्रीकांत महाराज राऊत, मा. शरद वसतकार हे राहतील,
तर या परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमोद देंडवे, प्रभाताई शिरसाट, मिलींद इंगळे, जि. प. अध्यक्ष संगीताताई अढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनिल फाटकर, जि. सभापती सौ. मायाताई नाईक, योगीताताई रोकडे, रिजवाना परवीन शे मुक्तार, आम्रपाली खंडारे, प्रदिप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, प्रा. संतोष हुशे, मनोहर पंजवानी,आम्रपाली तायडे, सुनिता टप्पे, शारदा सोनटक्के, आम्रपाली गवारगुरु, इम्रान खान मुमताज खान, राजकन्या कवळकार, अजय शेगावकर, शोभाताई शेळके, श्रीमती उषाताई प्रकाश राऊत, रूपाली अंकुश शहाणे हे राहणार असुन परिषदेच्या मुख्य आयोजन समितीमध्ये आकाश शिरसाट, मुश्ताक, प्रा. दिपक बोडखे, प्रा . धनंजय दांदळे, गजानन वाघमारे, पवन बुटे, डॉ निलेश उन्हाळे, भगवान थिटे, प्रदिप मांगुळकर, गोपाल ढोरे, हिरासिंग राठोड, रामकृष्ण सोनटक्के, प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव यांच्यासह प्रा. डॉ. शैलेश सोनोने हे आहेत.
या ऐतिहासिक परिषदेला महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहिर शितलताई साठे व सचिन माळी आणि त्यांचा संच हे प्रबोधनपर गिते गाणार आहेत. करिता ओबीसी बंधू -भगीनींनी या ऐतिहासिक परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य आयोजन समितीने केले आहे.