अमरावती ताज्या बातम्या

वडीलांचे छत्र नसतांना ती झाली सहाय्यक सहकार अधिकारी

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या डिजीटल युगात मुलींनी मोठी भरारी घेतली आहे मग ते क्षेत्र कोणतेही असो. एवढेच नाही तर देशातील इस्त्रोमध्ये देखील चंद्रयान-२, आदित्य एल-१ सारख्या मोहिमेत महिलांच्या नेतृत्वात प्रक्षेपण झाल्याचे बघितले. नासाने राबविलेल्या मोहिमेत भारतीय वशांच्या कल्पना चावलाने प्राणाची आहुती दिली तर सुनिता विल्यमने दोन वेळा जीवाची बाजी लावून अंतराळात भारतीय वशांची स्त्री म्हणून देशाचे नावालौकिक निर्माण केले. विविध क्षेत्रामध्ये “ती” पुरूषांच्या खांदयाला खांदा लावून देशाचा अवलौकिक मान सन्मान वाढवत आहे… अशा या जागतिक महिला दिनी वडीलांचे छत्र नसतांना “ती” सहाय्यक सहकार अधिकारी बनली “ति”च्या या प्रेरणादायी जिद्दीचा मागोवा, दैनिक राज्योन्नतीचे पत्रकार मंगेश-तरोळे पाटील यांनी मांडलेला विशेष वृत्तांत…

सावंतवाडी : “ती”ने कधी विचार सुद्धा केला नसेल, अशी परिस्थिती वडिलांच्या अकस्मात जाण्याने तिच्यावर आली. आलेली परिस्थिती मोठी गांभीर्याची, असंख्य संकटाची असल्याची जाणीव लक्षात घेऊन तिने घेतलेली भरारी, तिची यशोगाथा समाजाप्रती प्रेरणादायी आहे. आज तिच्या या जिद्दीमुळे महादेव कोळी समाजातील तरूण मुलींसमोर मोठा आदर्श निर्माण केला. शिक्षण हेच वाघींनीचे दूध आणि भविष्यातील जीवन जगण्याचा पर्याय, यशोचित्त जिद्द मनाशी बाळगून “ती” कुठे कमी पडू शकत नाही असा आत्मविश्वास कुमारी चैतालीच्या मनी अंगीकाल्याने मुली कुठेही मागे राहू शकत नसल्याचे उदाहरण महादेव कोळी समाजात उभे केले, त्याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे कमी…
विदर्भातील अमरावती जिल्हयातील दर्यापूर तालुक्यामध्ये कळासी येथील निवासी भरतराव व्यंकटराव कुटेमाटे सावंतवाडी, माजगाव येथे भाईसाहेब सावंत हायस्कूलमध्ये कर्मचारी म्हणून रूजू झाले. बघता बघता पत्नीसह दोन मुलींसह परिवार उभा झाला. पण परिवारातील हा प्रसंग नियतिला मान्य नसल्याने कै. भरतराव व्यंकटराव कुटेमाटे यांचे हद्य विकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलींनी निराधार झाल्या. मात्र, आपल्याला भाऊ किंवा किंवा आपण मुली आहोत असा कोणत्याही न्युनगंडाची भावना मनात न ठेवता कु चैताली हिने भाईसाहेब सावंत हायस्कूल माजगाव सावर्डे शिक्षण संस्थेतुन B. Sc. Agree मधून पदवी शिक्षण पुर्ण केले. पदवी अभ्यासक्रम पूर्ण होताच तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. बघता तिच्या यशाने नियतीने साथ दिली आणि आज रोजी उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे सहाय्यक सहकार अधिकारी ह्या पदावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेवर आधारावर तिची नियुक्ती झाल्याने तिच्या या गुणवत्ता व पदनियुक्तीसाठी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षांव होत असल्याची माहिती चैतालीचे मामा प्रकाश पाटील-फुकट यांनी दिली