Arms-seized-during-the-blockade-in-the-district!
क्राईम

अकोला जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान शस्त्रसाठा जप्त!

१० मार्च अकोला : जिल्हयात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरीता शनिवारी रात्री दहा ते रविवारी पहाटे पाच बरे वाजेपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून कोंबिंग मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेमध्ये पाच ठिकाणी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून विविध कारवाया सुद्धा करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे आदेशान्वये अकोला जिल्हयात अमावस्या नाकाबंदी चे आयोजन करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच व सर्व ठाणेप्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी असे एकुण ४२ अधिकारी व २४० अंमलदार यांनी सहभाग घेवुन नाकाबंदी दरम्यान खालील प्रमाणे प्रभावी कारवाई करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान रिफ्लेक्टर जॅके ट व टॉर्च घेवुन नाकाबंदी झिक झाक स्वरूपाचे बेरेके टींग करून तपासलेले प्रत्येक वाहनाचा कं माक व चालकाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमाक घेवुन दुचाकी २९७ व चारचाकी २३९ असे एकुण ५३६ चाहने चेक करून त्यापैकी ९१ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करून एकुण ३२७००रू दंड आकारण्यात आला.

१७४समन्स, ५९बेलेबल वारंट, १९ नॉन बेलेबल वारंट तामील करण्यात आले, तसेच ६८ निगराणी बदमाश व २९ माहितीगार गुन्हेगार चेक करण्यात आले आहे, कलम १२२ मपोका प्रमाणे एकुण ०९ कारवाई, भारतीय हत्यार कायदयान्वये ५ कारवाई करून ५ शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.

कलम ३३ आर डब्लयु प्रमाणे १ के सेस, कलम ११०, ११७ मपोका प्रमाणे एकूण ४३ के सेस तसेच जिल्हयातील एकुण ५७ हॉटेल लॉजेस व ५३ एटीएम चेक करण्यात आले.

महा. दारूबंदी कायदयान्वये ८ कसेस करण्यात आल्या आहेत.पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जिल्हयात मालमत्तेच्या व शरीराविरुध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरीता अशा प्रकारचे वेळोवेळी नाकाबंदी चे आयोजन करून सन २०२४ मध्ये एकुण ४१ कारवाई के ल्या तसेच कलम १२२ मपोका प्रमाणे एकुण ३८ के सेस करण्यात आल्या आहेत.