अकोला

अकोला: आर्थिक लुबाडणूक झालेल्या महिलांच्या पाठीशी राहणार मनसे महिला सेना

१० डिसेंबर अकोला: समाजात भोळ्याभाबड्या महिलांना कोणत्याही प्रकारे आर्थिक लुबाडण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.नाना प्रकारे युत्तäया वापरून आर्थिक गंडविल्या गेल्याच्या घटना महिलांच्या संदर्भात सातत्याने होत असून अशा भुक्तभोगी महिलांच्या पाठीशी मनसे महिला सेना ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्रशंसाताई अंबेरे यांनी दिली.

सौ अंबेरे यांना आर्थिक फसवणूक झालेल्या जोगळेकर प्लॉट परिसरातील माया चतुर या महिलेने निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. सौ चतुर यांनी सन २०११ मध्ये तीन खाजगी कंपनीच्या पॉलिसी गोरक्षण रोड परिसरातील रहिवासी महिलेकडून काढल्या होत्या.

आपण आपले वार्षिक प्रीमियम रक्कम १८१०२ रुपये भरणा करण्यासाठी सदर अभिकर्त्या महिलेकडे देत होतो.या अभिकर्त्याने सन २०१५ पर्यंत सुरळीत पैसे भरले.परंतु नंतर सन २०१६ ते २०२० पर्यंत तिने पॉलिसीचे पैसे न भरता या पैशांचा आपल्या खोट्या सह्या करून विड्रॉल करीत आपल्या पॉलिसीत आर्थिक अपहार केल्याचा आरोप प्रस्तुत निवेदनात महिलेने केला आहे. या संदर्भात आपण पोलीस निरीक्षक दाबकी रोड तथा पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार दिली आहे. परंतु या अर्जावर योग्य प्रकारे आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे आपण मनसे महिला शाखेकडे आलो असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले .या संदर्भात आपण पाठपुरावा करून नक्कीच न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे यांनी दिले.