ताज्या बातम्या

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी सहपत्नीक मतदान हक्क बजावला

अकोला – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल रोजी होत आहे. या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांच्यासह सहपत्नीक मतदान करून आपल कर्तव्य देशाप्रती आपले मतदान हक्क बजावला. अकोला लोकसभा निवडणूकीत अधिकृत उमेदवार वंचित कडून स्वत: अॅड. प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील तर महायुतीकडून अनुप धोत्रे निवडणूक रिंगणात उभे आहेत.

यावेळीही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या अकोला पॅटर्नची चर्चा सुरु आहे. अकोला जिल्हयात जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या वतीने दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मतांचे धुर्वीकरण होवून अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा विजय पक्का असल्याचे अकोला जिल्हयात चर्चा रंगत आहेत. जिल्हयातील धनगर, कोळी, माळी, बेलदार, मुस्लिम समाज अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या अकोला पॅटर्नची चर्चा सुरु आहे.

आंबेडकरांच्या अकोला पॅटर्नची चर्चा होते त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, “मराठा समाजाच्या हातात सत्ता आहे असं आपण म्हणतो पण ती खरंच मराठा समाजाच्या हातात नाही. तर मराठा समाजातील १६९ घराण्यांच्या हातात ही सत्ता आहे. पण ही घराणीचं आपल्याकडं मराठ्यांची सत्ता असल्याचं खपवतात. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली होती. काँग्रेसमधून अनेकजण भाजपत गेले होते. म्हणून आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं म्हटलं होतं. पण या १६९ घराण्यांना भीती अशी आहे की जर उमेदवारी ही सामाजिक झाली तर घराण्याची सत्ता जाईल आणि म्हणून यांनाच बाहेर काढा. त्यामुळं आमचा प्रचार असा आहे की, ज्यांना असं वाटतं सत्ता आपल्याकडं असली पाहिजे त्यांनी वंचितला मतदान करावं असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

स्वत : आंबेडकर यांनी यामागचं गणित उलगडून सांगितलं आहे. त्यांनी राजकीय रणनितीवरही भाष्य केलं. त्यामुळं आम्हाला उमेदवारी सामाजिक करता आली, यात आम्हाला यश आलं. अशा प्रकारे सर्व समाजाच्या उमेदवारांना संधी मिळतेय हे लक्षात आल्यानंतर या घराण्यांनी संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला. म्हणून त्याच्या आगोदरच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत आम्ही थोडी रणनीती बदलली. असेही त्यांनी यावेळी सांगितले.