मनोरंजन

अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई – अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता साहिल खानला अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमध्ये अटक केली.. दरम्यान त्याला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महादेव बेटींग ॲपचा प्रसार केल्याप्रकरणी साहिल खानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवाण्यात आली.

अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला छत्तीसगडमधून मुंबईत आणण्यात आलं. रविवारी साहिल खानला कोर्टात हजर करण्यात आलं. तसेच सुनावणीनंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्तीसगडमधून साहिल खानला शनिवारी ताब्यात घेण्यात आलं होतं, यानंतर त्यानं अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होत. मात्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान या प्रकरणात आता साहिल खानची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

महादेव बेटिंग या ॲप प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बेटिंग ॲपसंबंधित सर्व संकेतस्थळे परदेशातून नियंत्रित केली जात होती. महादेव बेटिंग ॲप या ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अभिनेता साहिल खान याचं नाव बेटिंग ॲप ऑपरेटर म्हणून एफआयआरमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे. माटुंगा पोलिसांनील आधीच 31 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप आहे. याशिवाय साहिल खानवर फक्त ॲप प्रमोशनच नाही तर ॲप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे.