अकोला प्रतिनिधी१ऑक्टोबर:-अकोल्यातुन खासगी बस मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची५०लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीला २४तासाच्या आत पकडण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थोडक्यात हकीकत अशी आहे की,ईश्वरराम देहाराम देवाशी, वय २०वर्षे, रा.माटूडा बोळी जि.बाडणेर राजस्थान हे अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील बालाजी हॉटेल मध्ये मुक्कामी होते.त्यानंतर ३०सप्टेंबर रोजी सायंकाळी७.३०वाजता दरम्यान, देवाशी मुंबईला जाण्यासाठी पोलीस मुख्यालय अकोला येथून राणा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमध्ये बसून निघाले,दरम्यान ही लक्झरी बस अकोल्याला वरून मुंबईच्या दिशेने निघाली असता, ही लक्झरी बस बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे रिधोराच्या समोर थांबली,तेव्हा अचानक एक तरुण बस मध्ये दाखल झाला, त्यानंतर त्या तरुणाने गाडी मध्ये ईश्वरदास कौन है, अशी विचारणा केल्यावर ईश्वरदास देवाशी समोर आले, नमूद इसमाने पोलीस असल्याचा बनाव करीत,तुम्हारे बॅग मे क्या है,आपकी बॅग की तलाशी लेना है,असे म्हणून देवाशी यांना बळजबरीने गाडी खाली उतरविले आणि त्यानंतर बस चालकाला गाडी घेऊन जाण्यासाठी सांगितले,ईश्वर दास देवाशी यांना खाली उतरविल्यावर,अगोदरच खाली दोन ते तीन इसम हजर होते, या सर्वांनी मिळून, ईश्वरदास यांना मारहाण करून, त्यांच्या कडे असलेली ५०लाख रुपयांची बॅग रकमेसह हिसकावून अकोल्याचे दिशेने पलायन केले, अशा आशयाची तक्रार, ईश्वरदास देवाशी यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल केली, या तक्रारीची दखल घेत, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश,अकोला स्थानिक गुन्हे शाखेला दिले, यावरून अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक गठीत करून, परिस्थिती जन्य पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादी ईश्वरदास देवाशी यांनी सांगितले आरोपींच्या वर्णनच्याआधारावर, तपासाची चक्रे फिरवीत,संशयित म्हणून यशपाल जाधव रा.कमला नेहरू नगर अकोला,रामविलास उर्फ गोविंद पवार रा.धाबेकर नगर खडकी अकोला,तन्वीर खान ऊर्फ जहागीर खान रा.गंगा नगर अकोला आणि अमित प्रेमशंकर मिश्रा रा.संतोष नगर खडकी अकोला यांना ताब्यात घेऊन, त्यांची कसून चौकशी केल्यावर, ईश्वरदास देवाशी यांची५०लाख रुपयांची रोकड लुटल्याची कबुली संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नमूद आरोपींनी दिली.त्यावरून नमूद आरोपींच्या विरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात दरोड्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव,गोपाळ मावळे, दशरथ बोरकर,फिरोज खान, गोकूळ चव्हाण, शक्ती कांबळे,वीरेंद्र लाड, स्वप्नील खेडकर यांनी केली.
५०लाख रुपयांची ही रक्कम, रोकड स्वरूपात ईश्वरदास देवाशी यांनी कशासाठी आणि कोठून आणली, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. शासनाने दोन लाख रुपयांच्या वरील रकमेचे आर्थिक व्यवहार हे ऑन लाईन पद्धतीने करायचे, असे बंधनकारक करण्यात आले असल्यावरही,ईश्वरदास यांनी५०लाख रुपयांची रोकड खासगी बस मधून मुंबईला कशा साठी घेऊन जात होते, हे अजून स्पष्ट झाले नाही. ही रक्कम हवाल्याची आहे का?तसेच हे ५०लाख रुपयांची रोकड ब्लॅक मनी आहे का या दिशेने पोलीस तपास करतील का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.५०लाख रुपयांची रक्कम लुटल्याच्या या घटनेवरून, खासगी बस मधून प्रवास करणाऱ्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.५०लाख रुपये लुटीच्या घटनेत, राणा ट्रॅव्हल्सचा मॅनेजर सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे, लक्झरी बस सेवा चालविणाऱ्याचे संबंध, गुन्हेगारी टोळ्यांसोबत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.या अगोदर घडलेल्या प्रवाशांना लुटीच्या घटनेचा,३०सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेशी संबंध आहे का, या दिशेने तपास होण्याची गरज आहे.
Post Views: 713