अकोला

१११ गड, किल्ले सर करून महाराजांना मानवंदना

अकोला : स्थानिक इंग्लिश हायस्कूलचे शिक्षक संतोष नारायण पुरी यांनी आतापर्यंत १११ गड किल्ले अभ्यासपूर्ण रितीने सर करून अभिनव पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

छत्रपती शिवराय व संभाजी राजे यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेली ८० गडकिल्ल्यांची माती संग्रहित करून शिवजयंतीला त्या पवित्र मातीचे पूजन करण्यात आले. स्थानिक उन्नती नगर कौलखेड येथील संतोष पुरी व अश्विनी पुरी यांच्या पुढाकाराने व छत्रपती सायकलींग ग्रुपच्या सहकार्याने शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी यशश्री पुरी, धनश्री पुरी व इश्वरी जाधव यांनी शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर गीत पोवाडे सादर केले. यावेळी छत्रपती सायकलींग ग्रुपचे संस्थापक डॉ. विनोद लाहोळे, आस्था योग फाउंडेशनचे चंद्रकांत अवचार, इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक राजकुमार तडस, वर्षा काटे, राजेश काटे, डॉ. खेडकर,उध्दव धाडे, विनोद इंगोले, संदीप नृपनारायण, मनोहर दिवनाले, शंतनु वक्ते, राजू नकासकर, सनी वानखडे, विजय हाडोळे, मंजू देशमुख व उन्नती नगरमधील रहिवासी उपस्थित होते.