आरोग्य

हॉटेल मधील खाद्य( मिठाई )पदार्थांना काल मर्यादाच नाही…!

 

मिठाईचे दरपत्रक लावले मात्र काल मर्यादा कुठे दिसेना ?जनसामान्याच्या आरोग्याशी खेळणे नव्हे का?

मूर्तिजापूर21फेब्रुवारी ;-शहरातील अनेक हॉटेलमध्ये खाद्यपदार्थाची विक्री होत असताना त्या ठिकाणी दर पत्रक लावलेले आहे मात्र काल मर्यादा कुठेच लावलेली दिसत नाही.
जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नागरिक उघड्यावरील खाद्यपदार्थांवर ताव मारतात. परंतु कुठल्याही ऋतूमध्ये अथवा ऋतूंमध्ये बदल होत असताना उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे हे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. त्यामुळे पोटाचे विकार व इतर आजार होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले असून उघड्यावरील खाद्यपदार्थ खाताना जरा जपून, असे म्हणायची वेळ आली आहे. शहरात शेकडो हॉटेल आहेत. मात्र, मुख्य चौकात बहुतांश खाद्यपदार्थांचा किरकोळ व्यवसाय हातगाड्यांवरच केला जातो. गरम तथा चटपटीत खाद्यपदार्थांवर रस्त्यावरील धूळ उडते. त्यावर कुठलीही जाळी टाकण्यात येत नसल्यामुळे माशा बसून अन्नपदार्थ दूषित करतात. ते पदार्थ नागरिकांच्या पोटात गेल्यानंतर मळमळ, अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ (ए), जंत संसर्ग, टायफाईट व इतर पोटाचे आजार होण्याची शक्यता असतांनाही, मात्र शहरातील काही हॉटेल, रेस्टॉरंट्स, अस्वछतेचा कळस पाहावयास मिळतो. हॉटेल मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मीठाई विक्री होतात त्याठिकाणी त्यांचे दरपत्रक आवर्जून लावलेले असतात मात्र काल मर्यादा कुठेच लावलेली दिसत नाही हे कृत्य जनसामान्याच्या आरोग्याशी खेळणे नव्हे का ? काल मर्यादा दर्शविणे अनिवार्य नाही का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे मात्र या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासन अथवा अन्न व खाद्य औषध प्रशासन विभाग डोळे झाक करत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
कुठलेही खाद्यपदार्थ विक्रीचे हॉटेल, रेस्टॉरंट्स, पथविक्रेत्यांना अन्न व खाद्य औषध प्रशासन विभागाचे व नगर परिषद विभागाचे परवाना घेणे अनिवार्य असते.परंतू मूर्तिजापूर शहरातील निम्म्याहून जास्त हॉटेल, रेस्टॉरंट व खाद्यपदार्थांचे पदविक्रेते यांच्या कडे कुठलेही परवाना नसतांनाही बिनधास्तपणे खाद्यपदार्थ विक्री करत असून या कडे मात्र नगरपरिषद प्रशासन असो किंवा अन्न व खाद्य औषध प्रशासन विभाग कुठलीही कारवाई करत नसल्याने या विक्रेत्यांकडून संबंधित विभागास महिन्याकाठी काही मोबदला दिला जातो की काय? असा यक्ष प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. यावर जनसामान्यास चर्चेला फार मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.