पातूर प्रतिनिधी:-31 मे सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने चांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू अड्ड्यावर छापमारी करून 31 हजारांहुन अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31मे रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना बातमीदारांकडून गोपनीय माहिती मिळाली की, चांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आलेगाव येथील निर्गुणा नदीच्या पात्रात मोठया प्रमाणात हातभट्टी द्वारे गावठी दारूची निर्मिती करण्यात येत आहे. अशी माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पाटील यांनी 31 मेच्या सकाळी 5 वाजता दरम्यान आपल्या पथकासह आलेगाव येथील निर्गुणा नदीच्या पात्रात धाड टाकली असता,नदी पात्रात आलेगावतील रहिवासी असलेला 25 वर्षीय शहजादखान जफरखान नदी पात्रात हातभट्टी द्वारे गावठी दारू पाळत असल्याचे आढळून आले,पोलिसांनी छाप पडल्याचे लक्षात येताच शहजादखान आणि सैयद सालारसैय्यद इस्माईल यांना ताब्यात घेण्यात आले परंतु या दोघांना मदत करणारे त्याचे 4 सहकारी घटनास्थळा वरून फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पंचासमक्ष नमूद हातभट्टीचे चित्रीकरण करून,नमूद आरोपींना ताब्यात घेऊन, त्यांना चांनी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडून मोह फुलाचा सडवा,गूळ, टिनाचे डबे,दारू साठविण्यासाठी असलेल्या प्लॅस्टिक कॅन सहित31हजार 522 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अटक करण्यात आलेल्या आरोपी आणि फरार झालेल्या आरोपींविरोधात चांनी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्याच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने केली आहे.पुढील कारवाई चांनी पोलीस करीत आहेत.
,
Post Views: 454