randhir-savarkar
अकोला कृषी

हरभरा खरेदी पुढील आठवड्यात सुरू करण्यात येईल अशी शासनाची स्पष्टोक्ती- आमदार रणधीर सावरकर

बोरगाव मंजू : अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या हरबरा खरेदी करण्या करिता नाफेड यंत्रणे कडून अद्यापही कोणते ही खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्‍यांना आपला उत्पादित केलेला हरबरा खुल्या बाजारात खाजगी व्यापार्‍यांना कमी भावात विकणे भागपडत आहे.

तसेच शासनाकडून हरबरर्‍यासाठी रुपये ५३३० प्रती क्विंटल आधारभूत किंमत निश्चित केलेली असतांना प्रत्यक्षात आज रोजी शेतकर्‍यांना खुल्या बाजारात ४२०० ते ४३०० रुपये प्रती क्विंटल हरबरा विकावा लागत आहे असे समजते. प्रती क्विंटल सरासरी १००० रुपये प्रमाणे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे शासनाने अत्यंत तातडीने हरबरा खरेदी केंद्रे सुरु करणे गरजेचे आहे.परंतु सदर यंत्रणांकडून सुद्धा कोणतेही खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेली नसल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी मा.अतुल सावे, मंत्री सहकार व पणन, मा.उपमुख्यमंत्री तसेच व्यवस्थापकीय संचालक यांना पत्राद्वारे लक्षात आणून खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती, यावर्षी हरभरा पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांचे घरात आलेले आहे परंतु शासनाने अद्याप पर्यंत हरभरा खरेदी केंद्र उघडलेली नाही या बाबत शेतकरी वर्गात प्रतिक्षा आहे.

अद्यापही हरभरा खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने आमदार रणधीर सावरकर यांनी मा. अतुल सावे मंत्री सहकार, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस तसेच सहकार व पणन सचिव अनुप कुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी असता केंद्र शासनाकडून याबाबतचे प्रस्तावाला मान्यता मिळाली असुन पुढील आठवड्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे मा. सहकार मंत्री तसेच पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी आमदार रणधीर सावरकर यांना स्पष्ट केले आहे,