क्राईम

शुल्लक कारणांवरून गावगुंडा कडून बार व्यवस्थापकाला मारहाण

औरंगाबाद ४ऑगस्ट:-औरंगाबाद सह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गाव गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात बार मध्ये घुसून शस्त्राच्या धाकावर लुटीची घटना ताजी असतांना,औरंगाबाद शहरातील हडको भागात येत असलेल्या लोटस बार मध्ये गाणे बंद केल्याच्या शुल्लक कारणावरून, बारच्या मॅनेजरला मारहाण करण्याची घटना घडली आहे. औरंगाबाद शहरात सुद्धा गुंडांची दहशत वाढली आहे. गावगुडांची दशदत मिटवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात असताना जिल्ह्यातून आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. बारमधील गाणे बंद केले म्हणून काही तरुणांच्या टोळक्याने व्यवस्थापकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. संबंधित घटना गुरुवारी रात्री उशीरा घडल्याची माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेवर संपूर्ण जिल्ह्यातील बार व्यवसायिक यांच्या वतीने नाराजी व्यक्त केली जात आहे.विश्वनिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या हडको परिसरातील लोटस बारमध्ये काही तरूण दारू प्यायला बसले होते. मात्र, दहा वाजल्याने व्यवस्थापकाने बार बंद करण्याचा त्यांना सूचना दिल्या. तसेच बारमध्ये सुरु असलेले गाणे बंद केले. यावर संतापलेल्या तरूणांनी बार व्यवस्थापकाला शिवगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे व्यवस्थापक आणि तरूणांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद आणखी पेटला आणि संबंधित तरूणांनी बार व्यवस्थापकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. बार मध्ये झालेल्या मारहाणीत बारचा व्यवस्थापक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.धुमाकूळ घालणाऱ्या तरुणांनी बार मध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा मारल्याचे संपूर्ण चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये रेकॉर्ड झाल्याने,पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.