blood-donation-camp-by-Tiger-group
अकोला

शिवजयंतीनिमित्त टायगर ग्रुप च्या २९ रक्तदात्यांचे रक्तदान

प्रतिनिधी / १८ फेब्रुवारी मूर्तिजापूर : येथील टायगर ग्रुपच्या वतीने शिवजयंतीनिमीत्य आयोजित रक्तदान शिबीरात आज २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

टायगर गृपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनात येथील शिवछत्रपती स्मारक परीसरात आयोजित या रक्तदान शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम कोरडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे यांनी केले.

सातत्याने समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या व विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या टायगर ग्रूपचे जिल्हा युवा कार्यकर्ता मनोज वानखडे यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबीरात रामभाऊ कांबळे, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, आदित्य भुईकर, ओम गावंडे, शुभम किर्दक, सिद्धार्थ उमाळे, दिनेश गाडे, पवन जवंजाल, सत्यम तायडे, बाळू इंदुरकर, प्रदीप काळे, सुमित वाकोडे, आकाश शहाळे, नितीन इंगळे व इतरांनी रक्तदान केले. अकोल्याच्या डॉ. बी. पी. ठाकरे मेमोरियल ब्लड सेंटरच्या चमुने सहकार्य केले.