सोलापूर२८ऑगस्ट:-सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आनंद चंदनशिवे हे दोन नगरसेवाकसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत भेट घेऊन, पक्षामध्ये प्रवेश संदर्भात बोलणी केली आहे. वंचितचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आपल्या दोन नगरसेवकांसह राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. अखेर चर्चेअंती त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातावर बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतल्याने सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीत येण्यापूर्वी ते बहुजन समाज पार्टीत काम करत होते.आगामी काळात महापालिका निवडणूकीच्या तोंडावर चंदनशिवे यांचा वंचित बहुजन आघाडीला दिलेला मोठा झटका आहे.चंदनशिवे यांच्या सोबत गणेश पुजारी आणि ज्योती बमगोंडा हे दोन नगरसेवक च सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करीत आहेत.२०१७च्या महापालिका निवडणुकीत चंदनशिवे यांनी त्यांच्यासह दोन नगरसेवक सोलापूर महापालिकेत निवडून आणले होते.शिवाय २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार यांच्या विरोधात निवडणूक लढवून २७हजार मत घेत मुसंडी मारली होती