CV-Raman
संपादकीय

राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विशेष लेख

महान वैज्ञानिक डॉ . सी . व्ही . रमण भारतामध्ये महान वैज्ञानिकांची एक मोठी परंपरा आहे. डॉक्टर होमी जहांगीर भाभा , सर जगदीशचंद्र बोस , सर विश्वेश्वरैय्या , डॉक्टर सी . व्ही . रमण, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम असे कित्येक महान वैज्ञानिक भारताने जगाला दिलेले आहेत. या महान वैज्ञानिकांनी आपल्या बुद्धीच्या आणि संशोधनाच्या जोरावर संपूर्ण जग दीपून टाकेल असे महान संशोधन केले आहे.

या साखळीतील महान शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर सी . व्ही . रमण आहेत . २८ फेब्रुवारी हा दिवस डॉक्टर सी . व्ही . रमण यांच्या ‘रमन इफेक्ट ‘या शोधाबद्दल राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो . डॉक्टर सी . व्ही . रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण असे होते. लहानपणापासूनच चंद्रशेखर कुशाग्र बुद्धीचे आणि अभ्यास वृत्तीचे होते . त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी मॅट्रिक्स ची परीक्षा उत्तीर्ण केली . एवढ्या कमी वयात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिले भारतीय होते .त्याचप्रमाणे त्यांनी आपले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे सेंट अलॉसियस च्या अँगलो इंडियन शाळेमधून पूर्ण केले. त्यांनंतर मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदवी संपादन केली. पदार्थविज्ञान या विषयावर त्यांचा विशेष रस होता. या विषयात त्यांनी सुवर्ण पदक पटकावले . १९०६ साली त्यांचा पहिला संशोधन पेपर प्रसिद्ध करण्यात आला . वयाच्या १९ व्या वर्षी इंडीयन फायनांस सर्विसेस मध्ये असिस्टंट अकाऊंट जनरल म्हणून ते रुजू झाले .

या ठिकाणी त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली. ध्वनी आणि ऑप्टिक्स मध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे .१९१७ साली कलकत्ता विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली .१९२६ मध्ये त्यांनी इंडियन जनरल ऑफ फिजिक्स ची स्थापना केली . एकदा युरोप मधून परत येतांना भूमध्य समुद्राचे पाणी निळे का आहे ? या विचारांनी त्यांच्या मनात घर केले . २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विकीरणाची एक अभिनव घटना त्यांनी शोधून काढली ज्याला त्यांनी ‘प्रकाश विखुरणे ‘ असे संबोधले . त्यासाठी त्यांनी एक वर्णी प्रकाश पारदर्शी माध्यमातून सोडला असता माध्यमाच्या अनुद्वारे प्रकाश शोषला जाऊन पुन्हा तीन प्रकारच्या तरंग लांबीचे प्रकाश किरण माध्यमातून बाहेर सोडले जातात हा शोध लावला.

या शोधाला ‘ Raस्aह Efाम्ू ‘ म्हणतात . समुद्राचे पाणी निळे का आहे ? हे ‘रामन इफेक्ट ‘ मुळे जगाला कळले . इतकेच नव्हे तर इंडस्ट्रीयल सेक्टर मध्ये , तसेच सर्व प्रकारच्या पदार्थांची ओळख पटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘रमण तंत्राचा ‘ उपयोग केला जातो . त्यांच्या या शोधामुळे २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . १९३४ मध्ये सी व्ही रमण बेंगळूरूच्या भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक बनले . त्यांनी स्टीलचे वर्णक्रमीय स्वरूप , स्टील डायनामिक्स ची मूलभूत रचना आणि गुणधर्म आणि बर्‍याच रंगहीन पदार्थाच्या ऑप्टिकल वर्तनावरही संशोधन केले .१९४८ मध्ये ते भारतीय विज्ञान संस्थांमधून निवृत्त झाले .त्यानंतर त्यांनी बेंगळूरु येथे ‘रमण संशोधन संस्था ‘ स्थापन केली . विज्ञानाच्या विचाराला आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली . थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर डॉ सी . व्ही . रमण यांचे विज्ञानातील योगदान खूप मोठे आहे . त्यांच्या या योगदानाची संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये दखल घेण्यात आली .

१९२४ मध्ये लंडन येथील रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्य बनवून घेतले . ही एक अतिशय बहुमानाची गोष्ट होती . त्यांच्या ‘ रमण इफेक्ट ‘ ने प्रभावित होऊन भारत सरकारने २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला . १९३० साली त्यांच्या ‘रमन इफेक्ट ‘ या शोधाबद्दल त्यांना ‘नोबल पुरस्कार ‘ देऊन सन्मानित केले व त्यांच्या कार्याचा गौरव केला . ही घटना संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची आणि गौरवाची आहे .त्याचप्रमाणे भारत सरकारने १९५४ साली त्यांच्या विज्ञानातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘भारतरत्न ‘ हा सर्वोच्च पुरस्कार बहाल करून त्यांच्या विज्ञानातील संशोधनाचा बहुमान केला . त्यांच्या संशोधनाची संपूर्ण जगामध्ये दखल घेतल्या गेली . १९५७ साली त्यांना ‘लेनीन शांतता पुरस्कार ‘देखील सन्मानाने प्रदान करण्यात आला . अशा या महान बहुतेक शास्त्रज्ञाचा वयाच्या ८२ व्या वर्षी २१ नोव्हेंबर १९७० रोजी प्रयोगशाळेत हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आणि देश एका महान शास्त्रज्ञाला मुकला .

श्री सुनिल दिवनाले विषय शिक्षक (विज्ञान )

जि . प . शाळा माझोड पं .स . अकोला