मूर्तिजापूर : २०१९ च्या विधानसभा निवाडणुकीत ४० हजारावर मते घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रविकुमार राठी यांना ‘राठीजी थोडक्यात हुकलं!’, अशी सांत्वना करत शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यशाचा मंत्र मूर्तिजापुरातील जाहीर सभेत दिला.
अहितकारक दारू लोकांना ओरडून वाटावी लागत नाही, मात्र हीतकारक तूप ओरडून वाटावे लागते आणि तिथेच घात होतो, तो होऊ द्यायचा नसेल, तर पुढच्या खेपेला तूप ओरडून वाटा, २०२४ मध्ये विजयश्री तुमचीच असेल’, हा सुषमाताईंचा सल्ला रविकुमारराठींनी तर, हसतमुखाने स्विकारलाच उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्याचे स्वागत केले.