sandeep-deshpande
क्राईम ताज्या बातम्या मुंबई

मॉर्निंग वॉक करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला

या घटनेत देशपांडे किरकोळ जखमी झाले असून ते धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे शुक्रवारी सकाळी मध्य मुंबईतील दादर परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना तीन अज्ञात व्यक्तींनी स्टंपने हल्ला केल्याने ते जखमी झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. या घटनेत देशपांडे किरकोळ जखमी झाले असून ते धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

“शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करताना मनसे नेते देशपांडे यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी स्टंपने हल्ला केला,” अधिका-याने सांगितले की, या संदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.