अमरावती – अकरा मजली इमारतीच्या गच्चावरून उडी घेवून अल्पवयीन युवतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी साडेसात वाजताचे सुमारास नया सातुर्णा येथे घडली. हर्षीता (१७, साईनगर, अमरावती) असे मृतक युवतीचे नाव आहे. अमरावती-बडनेरा मार्गावरील तापडीया मॉलच्या
मागील बाजूस असणाऱ्या नया सातुर्णा परिसरात ड्रिम्स प्राईड अपार्टमेंट आहे. याच अपार्टमेंटमध्ये राजापेठ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भंवर वास्तव्यास आहे. त्यांचे आरटीपीसी मेश्राम नामक पोलीस कर्मचारी आज अपार्टमेंटच्या खालील बाजूस उभे होते. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास इमारतीच्या गच्चावरून अचानक एक युवती खाली कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ जयदत्त भंवर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर युवतीला तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच त्यांच्यासह डिसीपी गणेश शिंदे यांच्यासह संपूर्ण वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या संशयावरून सदर युवती घटनास्थळी यापूर्वी आली असून, तिने अपार्टमेंटची रेकी केली. जेव्हा तिल सदर घटनास्थळ आत्महत्येसाठी योग्य वाटले तेव्हाच तिने हे पाऊल उचलले. गच्चीवर युवतीचा मोबाईव आढळून आला. त्यावरून तिची ओळख पटविण्या आली. युवतीच्या वडीलांचे साईनगर येथे दुकान आहे आत्महत्या करणारी युवती ही घरून दुचाक निघाली होती. दूध आणण्यासाठी ती घराबाहेर पड असल्याची माहीती पुढे आली आहे. युवतीच आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही राजापेठ पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत. घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली पंधरा दिवसाअंगोदर पोतदार शाळेतील मुलीसुध्दा एका बिल्डींगवर आत्महत्या करण्याकरिता चढल्या होत्या. सुदैवाने पोलिसांनी त्यांना शोधले. वाढत असलेल्या अशा पालकांची चिंता वाढविणाऱ्या आहेत.