मुंबई 14 ऑगस्ट,न्यूज डेस्क:-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समजले जाणारे तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअप द्वारे आमच्या मागण्या मान्य करा,अन्यथा तुमच्या मागे,ईडी,सीबीआय तसेच एन.आय.ए. सारख्या यंत्रणा मार्फत चौकशी लावू असा धमकीचा मेसेज पाठविण्यात आला आहे. अज्ञात व्यक्ती कडून आलेल्या याधमकीच्या मेसेज मुळे सेनेच्या गोठात खळबळ माजली आहे.याप्रकारची तक्रार नार्वेकर यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. अज्ञात व्यक्तीने कोणकोणत्या मागण्या मेसेज व्दारे केल्या, त्याचा उलगडा अद्याप पर्यंत झाला नसल्याचे समजलं आहे.नार्वेकर यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट करीत असल्याचा उल्लेख प्रामुख्याने केला आहे. काही दिवसांअगोदर मुख्य अतिरिक्त सचिव यांना शरद पवारांच्या नांवाने बदली करण्यासाठी धमकी दिल्याचा फोन आला होता, ही धमकी ताजी असतांना, नार्वेकर यांना असाधमकीचा मेसेज आल्याने याबाबत काय पवित्रा घेतल्या जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे