आरोग्य

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवकव श्रमिक कामगार संघटनेची जिल्हाची कार्यकारणी जाहिर

अकोला प्रतिनिधी१६ ऑगस्ट:- १५/०८/२०२१रोजी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अकोला जिल्हा च्या वतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.सदर कार्यकारणी रुग्णसेवक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रवीणजी भोटकर यांच्या आदेशा नुसार जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अध्यक्ष जयवंत नाईकुडे जिल्हा नर्सिंग स्कूल कॉलेजेस, साई मोटर ड्राइविंग स्कूल चे संस्थपक अध्यक्ष विजय वानखडे, डॉ मनोहर घुगे, जिल्हाध्यक्ष आशीष सावळे आदि मान्यवर यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना चे जिल्हा उपाध्यक्ष पदी सोनू वानखडे, उमेश इंगळे, विजय गावंडे, पातूर तालुका अध्यक्ष रक्षक देशमुख, अकोट तालुका अध्यक्ष योगेश लबडे, कोषाध्यक्ष अर्जुन बागडे, प्रसिद्धी प्रमुख समीर खान,अकोला तालुका अध्यक्ष योगेश बोधडे, सचिव पुष्कर हिवराळे, सदस्य प्रशिष खंडारे या वेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनाचे जिल्हाध्यक्ष आशीष सावळे यांनी सर्व सदस्य व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.