रिसोड : मालेगांव रोड रिसोड पासुन बिबखेड पर्यत बंद पडण्याच्या स्थीतीत आला होतो. तालुक्यासाठी अत्यन्त आवश्यक आसणारा हया रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे भूमिपुत्र कडुन रस्ता रोको करण्यात आला.
रस्ता रोको दरम्यान शकडो कार्यकर्ते व ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील पन्नास गावे या रोडने रिसोड बाजार पेठेत ये- जा करतात तसेच मालेगांव- अकोला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.
भूमिपुत्र च्या रस्ता रोको मुळे अनेक कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आखेर नॅशनल हायवे अॅथारीटी चे उप- कार्याकारी अभियंता चौधरी यांनी लेखी दिले कि 3 दिवसात बिबखेड ते रिसोड दरम्यान चे खड्डे भरून रोड सुरळीत केला जाईल.
लेखी दिल्या नंतर अंदोलन एक अठवडयासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली. अंदोलनासाठी संजय सदार, श्रीरंग नागरे, गजानन जाधव, विकास झुंगरे, रामेश्वर बोरकर, रवि जाधव, शंकर हुबां,माधव मापारी, गणेश सदार, डाॅ. अमर दहिहांडे, बाबाराव ढोणे, संतोष खरात, राजु खांबलकर, शंकर हुबांड, पवन खोंडकर, महाविर पवार, सीताराम लोखंडे, सुनिल ढोणे, एकनाथ बिबे, रजणीश खोंडकर, वसंतराव टाले, सुनिल भुतेकर, विशाल खंदारे, राम गिर्हे, समाधान गाडे, देविदास पवार यांच्या सह परिसरातील शेतकरी व भूमिपुत्र चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.