अकोट: तालुक्यात रब्बी हंगामातील गहू हरभर्याच्या पीक पेरा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीनंतर बाजारपेठेत हरभरा व गव्हाची आवक वाढली आहे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गहू हरभर्याची आवक असताना मात्र या दोन्ही पिकाला भाव नसल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहे.
तालुक्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे व त्यामुळे तालुक्यातील जवळपास ७० टक्के शेतकर्यांना खरीप हंगामात सोयाबीन व तुरीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते व हेच पीक शेतकर्यांसाठी प्रमुख व महत्त्वाचे झाले आहे परंतु बदलत्या परिस्थितीत व शेती हे व्यवसाय म्हणून करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याने रब्बी हंगामा पिक पेरा क्षेत्रात तालुक्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यात गहू हरभरा पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे पिक पेरा क्षेत्रात झालेल्या वाढीनंतर आता बाजारपेठेत गहु. व हरभराचा माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असताना मालाची आवक वाढली आहे.
एकीकडे गहू व हरभराची आवक वाढत असताना मात्र दुसरीकडे या दोन्ही पिकांना बाजारपेठेत भाव नाही गहू १७०० ते १९०० रुपया पर्यंत तर हरभरा ४२००ते ४५०० रुपयापर्यंत विकल्या जात आहे कमी भावात शेतकर्यांना आपला माल विकावा लागत आहे त्यात सोयाबीन नाही या वर्षी भावना असल्याने दोन पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी हे कमी भावामुळे मात्र आर्थिक अडचणी सापडले आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतातील पीक उत्पादनासाठी अतोनात मेहनत घेऊन शेती करणार्या शेतकर्यांना दोन्ही हंगामातील पिके घेतल्यानंतरही पुरेनासे झाले आहे, कारण शेतकर्यांना अपेक्षित असणारे भाव हे मिळत नाही तर दुसरीकडे मात्र बाजारपेठेत इतर जीवनाशक वस्तूचा इतर वस्तूचे भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून महागाई वाढत चालली आहे त्यामुळे संसाराचा बजेट कसा बसवावा असा प्रश्न शेतकर्यासमोर उपस्थित झाला आहे त्यात मुलांच्या शिक्षणाबरोबरच दवाखाने हॉस्पिटलचा खर्च कसा भागवावा याची चिंता ही शेतकर्यांना लागली आहे.
त्यात कमी भावामुळे शेतकर्याचे उत्पन्न कमी झाल्याने त्यांचे वर्षभराचे बजेट मात्र कोलमडले आहे त्यामुळे गहू हरभरा या पिकांना व्यवस्थित भाव मिळावे यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे व याकडे शासनाने लक्ष द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.