अनिल वीर
सातारा२८ऑगस्ट : वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्ष व युवक कार्यकारणी व महिला कार्यकारणीच्या सदस्यांनी विविध विषयांवर आंदोलन जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयावर आगामी नगरपालिका, महानगरपालिका आदी सर्व स्थानिक संस्थेच्या निवडणुकात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात.ओबीसीसह सर्व मागासवर्गीय यांच्यावरील अन्यायाचे निराकरण करणे.जातनिहाय जनगणना करणे.कोरोनामुळे १८ आलुतेदार व १२ बलुतेदार यांची आर्थिक परिस्थिती मेटाकुटीस आली आहे. तेव्हा लघु-उद्योगांची भरभराट होण्यासाठी रु. ५० हजारपासून १ लाखापर्यंत एक रक्कमी मदत सर्वांना द्यावी.ओबीसी आर्थिक विकासमंडळ निर्माण करून प्रत्येक जिल्हानिहाय कार्यालये कार्यान्वित करून अर्थपुरवठा करावा.शिक्षण व नोकरीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन पदोन्नतीसुद्धा लागू करावी.मेघा भरती करून समाजास न्याय द्यावा. कोव्हिडमूळे मृत्यू झालेल्यांच्या पाल्याने पूर्णपणे शासन दत्तक घेणार आहेत.मात्र,अद्याप कार्यवाही नाही.तेव्हा त्याची पूर्तता करावी.स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असली तरी अल्पसंख्याक,मागासवर्गीय आदी समाजघटकावर अन्याय चालूच आहे.माळशिरस तालुक्यातील माळवाडी येथील मातंग समाजातील धनाजी साठे या युवकाचा स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी मज्जाव केल्याने निषेधाबरोबरच समाजकंटकावर कडक स्वरूपाची कारवाई करावी.अशा अनेक मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन छेडण्यात आले.सचिव गणेश भिसे, संजय करपे आदींच्या पुढाकाराने घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.यावेळी सचिव गणेश भिसे, संदीप कांबळे, फारुख पटणी, संजय करपे,चित्रा गायकवाड, द्राक्षा खंडदरे,सायली भोसले, साहित्यिक प्रकाश काशीळकर, ऍड. दयानंद माने,सतीश कांबळे, दीपक धडचिरे , दीपक चव्हाण, प्रमोद क्षीरसागर,शशिकांत खरात ,विजय वानखेडे, अशोक शिलवंत,प्रकाश कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष उद्धव कर्पे,विविध क्षेत्रातील मान्यवर- कार्यकर्ते उपस्थित होते.