अकोला

चारशे महिलांची निःशुल्क आरोग्य तपासणी: महिला दिनी ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे आयोजन

अकोला : नगरसेविका असताना दिवंगत अॅड. धनश्री देव अभ्यंकर या जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी महिला सत्कार, महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करत होत्या. त्यांच्या निधनानंतर निलेश देव मित्र मंडळाने त्यांनी सुरु केलेले उपक्रम कायम ठेवले.

यंदा देखील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन निःशुल्क आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त जठारपेठ, न्यू तापडीया नगर, रामदास पेठ, निबंधे प्लॉट, उमरी परिसरातील सुमारे ४०० महिलांनी आरोग्य तपासणी महाआरोग्य शिबिरात करण्यात आली. त्याच बरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन या निमित्त करण्यात आले. पॅथॉलाजी चाचण्या देखील यावेळी करण्यात आल्या.

निशुल्क आरोग्य महाशिबीराच्या उदघाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, प्रमुख पाहुण्या म्हणून पुष्पाताई इंगळे यांची उपस्थिती होत्या. यावेळी विविध डॉक्टर्स महिलांच्या आरोग्य शिबिरात उपस्थित राहतील. दंतरोग तज्ञ डॉ. आर बी हेडा, शल्य चिकित्सक प्रसुती व स्त्री रोग तज्ञ डॉ. तुलिका सिन्हा, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. कल्याणी महल्ले, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. मदन महल्ले, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. निखिल लहाने, लॅपरोस्कॉपी व एन्डोस्कॉपी सर्जन डॉ. संदिप इंगळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रणय महल्ले, डॉ. निखिल बोर्डे, त्वचा रोग व सौंदर्य तज्ञ डॉ. सुमेध खंडारे आदींची उपस्थिती होती.

उपस्थित डॉक्टरांनी महिला व लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करत औषधे व इतर आवश्यक केल्या. ब्लड शुगर, फास्टिंग पोस्टिंग टेस्ट, डॉ हेडगेवार रुग्णालय व अणूसंधान केंद्र अकोला व निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने फास्टिंग टेस्ट (उपाशी पोटी) व पोस्टिंग टेस्ट ( जेवणानंतर दीड तासांने) करण्यात आली. त्याच बरोबर जठारपेठ मधील स्वीट मार्ट व उपहारगृह यांना आदींची उपस्थिती होती.

ओला व सुखा कचरा वर्गीकरणाकरिता डस्टबिन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे प्रशांत राजुरकर, पुर्व झोन क्षेत्रिय अधिकारी व कर अधीक्षक विजय पारतवार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जठारपेठ भागात डस्ट बीन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, तसेच अॅड. धनश्री देव रुग्ण कल्याण उपकरण बँक तसेच निलेश देव मित्र मंडळातर्फ करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन दिलीप देशपांडे यांनी केले. यावेळी निलेश देव, जयंतराव सरदेशपांडे, शैलेश देव, रश्मि देव, मोहन काजळे, मिनाश्री आपोतीकर, सुचना महेश जोशी, शंकरराव इंगळे, भास्करराव बैतवार, रामहरी डांगे, राम उमरेकर, विजय वाघ, शशिकांत हिवरखेडकर, प्रकाश जोशी, राजु कनोजिया, वंदना वासनिक, मनोहर बनसोड, राजु गुल्लनवार, कैलास तिरपुडे, शेगावकर गुरुजी, विशाखा गुल्लनवार, समिश्रा गुल्लनवार, सुधीर मस्के, बबलु तिवारी, रविंद्र मेश्राम आदींची उपस्थिती होती.