क्राईम

गांजाची लागवड करणाऱ्याला अटक! जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई

  • अकोला प्रतिनिधी:-२४नोव्हेंबर रोजी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या धारूर(शहानुर) शेत शिवारात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी केली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या धारूर(शहानुर)शेत शिवारात येत असलेल्या, रामेश्वर तायडे या शेतकऱ्याने त्याच्या मालकीच्या शेतात गांजाची लागवड केली आहे,अशी गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली,त्या माहितीच्या आधारे ,पंच सोबत घेऊन  पंचा समक्ष रामेश्वर तायडे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता, रामेश्वर तायडे यांच्या शेतात ५ते ६फूट गांजाची ६ झाडे  मिळून आली. ही झाडाची लागवड करून त्याची जोपासना केली जात होती, असे पाहणी दरम्यान स्पष्ट झाले.त्यावरून नमूद गांजाची झाडे ताब्यात घेऊन, त्याचे वजन केले असता,त्या गांजाची झाडाचे वजन२किलो ७००ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून रामेश्वर तायडे यांच्या विरोधात अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात एनपीडिएस ऍक्ट कलम २०ब,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपिला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत३०हजार रुपये इतकी आहे.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार, पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने केली.