आरोग्य

*गणेशोत्सव पर्वातही सुरू आहे माझे शहर माझी जबाबदारी अभियान*

अकोला१३सप्टेंबर:-ग्रामगीतेतील गाव स्वच्छतेची कास धरीत,संपूर्ण महानगराला स्वच्छ करण्याचा चंग बांधणाऱ्या माझे शहर माझी जबाबदारी अभियानाची स्वच्छता मोहीम अगदी गौरी गणपती पर्वावरही जोमाने सुरू होती,त्याला आज नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. .दर रविवारी असणाऱ्या या अभियानाचा सहावा टप्पा रविवारी संपन्न झाला.यातही अनेक स्वयंसेवकांनी हजेरी लावून परिसर स्वच्छता व साफसफाई मोहीम राबवित वृक्षारोपण केले.या अभियानाचा सहावा साफसफाईचा टप्पा हा गोरक्षण रोडवरील सहकार नगर परिसरात राबविण्यात आले.सकाळी या अभियानाचा प्रारंभ अभियानाचे संयोजक पंकज जायले,नगरसेवक मंगेश काळे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे डॉ रामेश्वर बरगट, प्रा डॉ ममताताई इंगोले,प्रा संतोष तराळ, तुषार जायले,आर्कि अनंतराव गावंडे,अवि गावंडे, विलासराव हरणे डॉ नितीन गायकवाड यांच्या उपस्थित झाला. कोरोनाचे पालन करीत सहकार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिर, हरीश कॉलनी, अश्विनी लेआउट, डॉ पंजाबराव देशमुख कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, रामजी हाउसिंग सोसायटी, रिद्धी सिद्धी कॉलनी आदी परिसरात साफसफाई,स्वच्छता तसेच वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. नव्यानेच उभारण्यात आलेल्या *श्रीसंत वासुदेव महाराज बाल उद्यानाचे* लोकार्पण थाटात करण्यात आले.या अभियानात 150चे वर स्वयंसेवक हरीत गणवेशात वाहनासह व झाडू टोपली, फावडे हातात घेऊन सामूहिक स्वच्छता करताना दिसले.माझे शहर माझी जबाबदारी स्वच्छता अभियानाचे संयोजक पंकज जायले यांनी श्रीसंत‌ वासुदेव महाराज बाल उद्यान उभारण्यामागिल भूमिका यावेळी विशद केली.अभियानात नागरिकांना अभियानाच्या वतीने ग्रामगीता व इम्मुनिटी किटचे वितरण करण्यात आले. या अभियानात किरण देशमुख, चेतन ढोरे, नीलेश निकम, विवेक ठोसर,अमित ठाकरे, राजू धमाले,अविनाश कुंभार, स्वप्निल भद्दे,अमित पुरी, रोहित पवार, अंकुश लुले, रवी माळी, योगेश पाटोळे, डॉ मिलिंद देशमुख, दिवाकर टाले, डॉ प्रा ज्ञानसागर भोकरे, प्रशांत खर्चे, अमित सोमानी, नंदकिशोर चतरकर, डॉ देवेंद्र कोल्हे, अजय कट्यारमल, शिरीष तोषनीवाल,संजय शिरेकर समवेत संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, गुरुदेव सेवा मंडळ, सत्यसाई सेवा समितीचे पदाधिकारी, शिवस्मारक समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्वयसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.