अकोला प्रतिनिधी२२ऑगस्ट:-अकोला शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरून हैदोस घालणाऱ्या दोन दुचाकी चोरट्यांना खदान पोलिसांनी अटक केली.शुभम साहेबराव इंगळे,आणि प्रशांत अजाबरव इंगळे अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, कौलखेड चौकात असलेल्या कराळे हॉस्पिटल समोरुन५ऑगस्ट२०२१रोजी एम. एच.३७-वाय-०७४७ क्रमांक असलेली काळ्या रंगाची दुचाकी चोरीला गेली होती. त्यावरून दुचाकी मालक गोपाल गावंडे,रा.सूर्या हाईट्स, खडकी, अकोला यांनी, खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खदान पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून, खबऱ्या मार्फत तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासून,बाळापूर तालुक्यातील तामसी येथील असलेल्या शुभम इंगळे आणि प्रशांत इंगळे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन,त्यांची कसून चौकशी केली असता,कौलखेड चौकातील कराळे हॉस्पिटल समोरून चोरलेली मोटरसायकल आणि आणखी एक दूसरी मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एम.एच.३७-वाय-०७४७ आणि एम.एच.३०बीई-१९४९ क्रमांकाच्या दोन दुचाकी जप्त करून, दोन्ही चोरट्यांना खदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक९०२/२०२१ कलम३७९ गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.जप्त करण्यात आलेल्या दुचाकीची एकूण किंमत६०हजार रुपये इतकी आहे.या चोरट्यांचा जिल्ह्यातील आणखी काही चोरी प्रकरणात सहभाग आहे का, याचा तपास खदान पोलीस करीत आहेत. ही कारवाई खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीरंग सनस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील,पो.हे.कॉ. सदाशिव मार्गे,पो.हे.कॉ. राजेश वानखडे,सुरेंद्र दाभाडे, विजय चव्हाण, धीरज वानखडे,खुशाल नेमाडे,गणेश डुकरे, विक्रांत अंभोरे यांनी केली.