आरोग्य

कोरोनाच्या लसीकरणासाठी दुर्धरआजारग्रस्त मुलांना सवलत!

नवी दिल्ली२५ऑगस्ट:-देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठे, आणि मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, आता केंद्र सरकारच्या वतीने खूप महत्त्व पूर्ण निर्णय घेण्यात आला असून,या निर्णयाअंतर्गत,ज्या मुलांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर,हृदय संबंधित आजार,निमोनिया सारखे दुर्धर आजार आहेत.अशा मुलांचे लसीकरणाला प्राधान्य देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आल्याचे,केंद्रीय लसीकरण स्थापन मोहिमेचे अध्यक्ष डॉ. एन.के.अरोडा यांनी सांगितले आहे.लसीकरणासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.एन.के. अरोडा यांनी सांगितले आहे की, लहान मुलांचे लसीकरण करताना प्रथम आजारी मुलांचे लसीकरण केले जाणर आहे. मुलांमध्ये होणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार होत असल्याने याला थोडा वेळ लागू शकतो. तसेच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की यामध्ये २०ते २५ रोगांचा सहभाग करण्यात येणार आहे.१२ते १८ वर्षातील लहान मुलांची संख्या तब्बल १२ कोटीच्या जवळपासआहे. तर १८ वर्षावरील मुलांची संख्या९४ कोटींच्या आसपास आहे. आता सरकारला पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करायचे आहे. आगामी दिवसात 12 ते 18 वर्षातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी झायडस कॅडिला कंपनीच्या लसीचा वपार करण्यात येणार आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांच्या मते, सुरूवातीला झायडस कॅडिला कंपनीच्या लसीचा पुरवठा अधीक होण्याची शक्यता आहे. यासाठी डीएनए आधारीत या लसीला लहान मुलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. याचा अवलंब करण्याकरिता तसेच मागणीसाठी आमची पीएमओ सोबत बैठक होणार आहे.आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणातून कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर इस्पितळात दाखल झालेल्या ७०टक्क्यांच्या मुलांना काहीना काही दुर्धर आजार असल्याचे समोर आल्याने, दुर्धर आजार असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे