मनोरंजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरअनिल कपूरच्या मुलीचा विवाह सोहळा साध्या पध्दतीने

मुंबई 15 ऑगस्ट : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या दुसऱ्या मुलीचा विवाह सोहळा मुंबई मधील जुहूस्थित बंगल्यात संपन्न झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विवाह सोहळ्याचे अगदी साध्या पध्दतीने आयोजन करण्यात आले होते.

अनिल कपूरच्या पहिल्या मुलीचं लग्न मुलगी सोनम कपूर चे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडला होता.अनिल कपूरची दुसरी मुलगी रियाकपुर अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी सिनेजगतात सक्रिय आहे.ती चित्रपट निर्माती असून,ती एका प्रसिद्ध ब्रँडची मालक आहे.रिया कपूरच लग्न ती ११वर्षा पासून ओळखत असल्याने करणं बुलाणी सोबत झालं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विवाह सोहळा मेहंदी, संगीत कोणत्याही प्रकारचे डेकोरेशन न करता अगदीच साध्या पद्धतीने केल्याचं बोललं जात आहे .या लग्नसमारंभ सोहळ्यात अगदी जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते.

यामध्ये प्रामुख्याने अर्जुन कपूर, बोनी कपूर, जान्हवी कपूर, मसाबा गुप्ता, अंशुला कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, संदीप मारवाह, संजय कपूर, माहीप कपूर आणि जहान कपूर संपूर्ण कपूर कुटुंबासह जवळच्या नातेवाईंकाचा सहभाग होता